Posts

Showing posts from January, 2026

पाली-जाभुळपाडा-अक्कलकोट...

Image
दर वर्षी दिवाळीत मी सहपरिवार सहल करतो. छान ठिकाणं, तिथलं खाद्य आणि संस्कृती अनुभवतो. एक जानेवारी २०२६ला मी एक संकल्प केला. तो संकल्प होता देव दर्शनाचा. वर्षातून एकदा का होई ना, पण एखाद्या देवळाला किंवा पवित्र जागेला भेट द्यायचीच हा विचार. सकाळी माझी ही कल्पना मी कुटुंबासमोर मांडली, आणि ती लगेच मान्यही झाली... पाली-जाभुळपाडा-अक्कलकोट (पहिला भाग)... माझ्या देव दर्शनाच्या संकलल्पासाठी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि तुळजापूरची तुळजाभवानी या दोन देवस्थानांचे विचार मनात होते. पण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही श्री गणेश वंदनेने केली जाते. म्हणून माझ्या संकल्पाची सुरुवातही, पालीचा बल्लाळेश्वर आणि जांभुळपाड्याचा सिद्ध-लक्ष्मी गणेश, या दोघांच्या दर्शनाने करायची असं ठरलं. २४ ते २६ जानेवारी ही तीन दिवसांची मोठी सुट्टी असल्याने हेच दिवस आम्ही निवडले... पाली... पालीला किंवा जांभुळपाड्याला आपल्या गाडीने जाता येतंच, पण पनवेल किंवा खोपोलीमार्गे बसची सुविधाही आहे. आम्ही तोच मार्ग निवडला. २४ जानेवारी २०२६ रोजी एकदम सकाळी, मुंबईच्या गोरेगाव रेल्वे स्थानकावरून आम्ही सुरुवात केली. पनवेलच्या ट्रेनने आम्ही...